Brand Kisan Alert : राज्यात या जिल्ह्यांना अलर्ट पुढील बारा दिवसात मुसळधार पावसाचा इशारा
Brand Kisan : राज्यात मान्सून चांगला सक्रिय झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. पुढील बारा दिवसात राज्यात भरपूर पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. जुलै महिना पावसाचा असणार आहे राज्यात आता पुढील बारा दिवस पाऊस कायम राहणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट दिले आहेत. काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील धरणांमधील जलसाठ्यात चांगली वाढ होणार आहे कोकणात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही हवामान विभागाने दर्शवला आहे.
कुठे कोणता अलर्ट Brand Kisan News :
कोकणातील अन विदर्भात ऑरेंज कलर दिला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच खानदेश, मध्ये महाराष्ट्र सह दहा जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. राज्यात आला 27 जुलै पर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

0 Comments