शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे , या दिवशी मिळणार पीएम किसान चा 14 हप्ता, परंतु या लोकांना मिळणार नाही तपासून पहा आपले नाव आहे का?
PM Kisan Yojna : PM किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदतकिसान सन्माननिधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते .हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात . आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 13 हप्ते पूर्णपणे जमा झालेली आहेत. आता पुढचा चौदावा हप्ता कधी येणार याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये चांगलीच सुरू आहे पण चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार हा हप्ता 15 जुलै नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे
या शेतकऱ्यांना मिळणार नाही 14 वा हप्ता
खूप लोकांना पीएम किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या शेतकऱ्यांना अद्याप तेरावा हप्ता मिळाला नाही किंवा त्यांचेही केवायसी अद्याप झाले नाही .अशा शेतकऱ्यांना आपला पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता मिळणार नाही यासोबतच जर एखाद्याच्या आधार कार्ड मध्ये काही चूक झाली असेल तर त्याचा 14 वा हप्ता थांबवला जाऊ शकतो म्हणून जर तुमची एक केवायसी झाली नसेल तर त्वरित करून घ्या .
ऑनलाइन ई-केवायसी असे अपडेट करणार ?
ऑनलाइन केवायसी करण्यासाठी प्रथम पीएम किसान सामान्य निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ई केवायसी पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
इ के वाय सी च्या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल यानंतर पीएम किसान सामान निधीची लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाईलवर तुमचा ओटीपी येईल तो ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
नंतर या संपूर्ण प्रक्रियेनंतर तुमचे केवायसी चे काम संपूर्ण पूर्ण होईल आणि तुमची नोंदणी प्रविष्ट होईल.
👇👇👇👇

0 Comments